लातूर:- लातूर शहराची सिटी बस जनु कोरोना ला ठेगा दाखवण्याचे काम करत आहे अशी जनतेमध्ये चर्चेस उधाण आले आहे. कारण पुर्ण देश कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. ओमीक्रॉन हा 500 च्या वेगाने सुसाट धावत सुटला आहे त्यात लातूर शहरातील सिटी बस ही सुसाट वेगाने पळवत आहे की काय ? कारण सिटी बस मध्ये शोशल डिस्टेटिंग चा पुर्ण फज्जा उडाला आहे . यात महिला व विद्यार्थ्यींनी ना मोफत बस सेवा देण्याच्या महापालिकेच्या निर्णयानंतर जरा जास्त गर्दी होत आहे लोक उभे टाकून सुध्दा प्रवास करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टेंटिंग न पाळने,आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या बस मध्ये आढळून येत आहेत त्यामुळे कोरोना वेगाने पसरण्याची शक्यता आहे यामुळे जनतेतुन सुर निघत आहे की जिल्हाधिकारी याच्याकडे लक्ष देतील का ?
No comments:
Post a Comment