मुंबई, दि. २२ : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कीर्तीताईंनी आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला संगीत आणि अभिनयाचा वारसा जपला आणि पुढे वाढवत नेला. आपल्या गोड गायनाने आणि प्रसन्न अभिनयाने कीर्तीताईंनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. संगीत रंगभूमीची सेवा करण्याचे आई-वडिलांचे व्रत त्यांनीही जोपासले आणि खूप कष्ट सोसून संगीत रंगभूमी जागती ठेवली. त्यांचे हे उपकार संगीत रंगभूमी कधीही विसरू शकणार नाही, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0000000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3tQbb42
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment