भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये - latur saptrang

Breaking

Friday, January 14, 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये

मुंबई, दि. 14 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेसाठी केलेले  कार्य अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे, असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.

पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नामांतर आंदोलनातील लढ्यातील शहिदांना अभिवादन करून श्री. गजभिये यांनी नामांतर लढ्यातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. महासंचालक श्री. गजभिये म्हणाले, मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचा पाया रोवला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आजच्या दिवशी  देऊन नामविस्तार करण्यात आला.

यावेळी बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती स्मिता राऊत,  श्री. राजेन्द्र बरकडे, तसेच बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती शिल्पा शिवणकर, श्रीमती सुनंदा गायकवाड, श्री. प्रदिप भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. रामदास लोखंडे यांनी केले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3zWydaq
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment