लातूर/प्रतिनिधी:अतिक्रमणे करणार्यांच्या विरोधात मनपाने कारवाई सुरू केली असून याअंतर्गत शुक्रवारी ( दि.२१) अशोक हॉटेल येथील यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स समोरील ७ टपऱ्या व गाडे काढण्यात आले.
शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला जातो.अशा पद्धतीने अतिक्रमणे करणाऱ्यांना मनपाच्या वतीने वेळोवेळी नोटिसा दिल्या जातात.तरीही अतिक्रमणे होतच राहिली तर ती काढून साहित्य जप्त केले जाते.
अशोक हॉटेल येथे असणाऱ्या यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स समोरील जागेत अशाच पद्धतीने अतिक्रमणे करण्यात आली होती.शुक्रवारी त्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली.अतिक्रमण विभाग प्रमुख रवी कांबळे, सुरेश कांबळे,अजय घोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत एकूण ७ टपऱ्या व गाडे काढून टाकले.
अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.कोणीही अतिक्रमणे करू नयेत.मुख्य रस्ते व चौकात तसेच इतरही ठिकाणी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले तर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment