डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतिशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार - latur saptrang

Breaking

Thursday, January 27, 2022

डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतिशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि २७ :- “ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट कृतिशील विचारवंत होते. समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केलं. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचं कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामजिक कार्यकर्ता असं बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या,  ‘मुक्तांगण’ परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/34dL4sJ
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment