मुंबई, दि. 13 :- मकर संक्रांत आपल्याला संक्रमण आणि बदल स्वीकारण्याचा संदेश देते. त्यासाठी आपण परस्परांची काळजी घेत कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करूया आणि या संक्रमणातून बाहेर पडून आरोग्याचा गोडवा वाढवूया, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणतात की , पृथ्वी आणि सूर्याचं हे नातं आपल्याला संक्रमणाला सामोरे जाण्यास शिकवते. जगावर गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचे संकट घोंगावते आहे. यातही आपण संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत पुढे जात आहोत. उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीकडूनही आपण हाच संदेश घेऊया. परस्परांची काळजी घेऊया. गर्दी टाळूया. एकमेकाला आरोग्यदायी, समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा देऊया. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3I6Ko7r
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment