‘आदिवासी संवर्धन परिषदे’च्या माध्यमातून आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी काम करणार – आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी - latur saptrang

Breaking

Tuesday, January 4, 2022

‘आदिवासी संवर्धन परिषदे’च्या माध्यमातून आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी काम करणार – आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी

मुंबईदि. 4 : आदिवासी बांधवांच्या अधिकार व  हक्कासाठी कार्य करणाऱ्या जयपाल सिंग मुंडा यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी दिलेला लढा अविस्मरणीय आहे. त्यांनी आदिवासी समाजाची बाजू संसदेच्या संविधान सभेत भक्कमपणे मांडून आदिवासींना न्याय मिळवून दिला. जयपाल सिंग मुंडा यांच्या जयंतीनिमित्त स्थापन केलेली ‘आदिवासी संवर्धन परिषद’ आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी काम करेलअसे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

मानव शास्त्रज्ञ डॉ. आर. के. मुटाटकर यांच्या अध्यक्षतेखाली जयपाल सिंग मुंडा यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादास जयपाल सिंग मुंडा यांचे सुपुत्र जयंत जयपाल सिंग मुंडा यांची विशेष उपस्थिती होती. साहित्य समिक्षक व भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवीआमदार कपिल पाटीलविभागाचे सचिव अनुप कुमार यादवआदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारुड तसेच महाराष्ट्रमध्यप्रदेशझारखंडआसामउत्तरप्रदेशगुजरातराजस्थानजम्मू व काश्मिर या राज्यांतील राजकीय क्षेत्रातील आदिवासी समाजातील खासदारआमदार व मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री ॲड.पाडवी म्हणाले, संसदेच्या संविधान सभेमध्ये ‘आदिवासी’ हा शब्द भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यासाठी जयपाल सिंग मुंडा यांनी विशेष संघर्ष केला. परंतु, राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये ‘आदिवासी’ हा शब्द समाविष्ट होऊ शकला नाही. आदिवासी संवर्धन परिषदेच्या माध्यमातून शासन यासाठी प्रयत्न करणार असून राज्यघटनेतील 1976 च्या घटनात्मक दुरुस्ती Area Remove Act, 1976  यातील अडचणी लक्षात घेता अनेक बाबींवर अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत मंत्री ॲड.पाडवी यांनी व्यक्त केले.

या परिसंवाद प्रसंगी जयपाल सिंग मुंडा यांच्या जीवनदर्शिकेचे प्रकाशन व रेखाचित्राचे अनावरण आमदार कपिल पाटील व गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात आले. 

संविधान सभेत आदिवासींच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम जयपाल सिंग मुंडा यांनी केले होते. या महान अष्टपैलू व्यक्तिमत्वास त्यांच्या कार्यासाठी भारतरत्न मिळावात्यांच्या संसदेतील कार्याची ओळख भारतीय समाजाला व्हावी या दृष्टीकोनातून त्यांचा पुतळा संसदेच्या आवारात उभारण्यात यावा त्याचप्रमाणे राष्ट्रपुरूषांच्या यादीमध्ये जयपाल सिंग मुंडा यांचा समावेश करण्यात यावा यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करणार आहे. तसेच त्यांचे तैलचित्र महाराष्ट्राच्या विधीमंडळ परिसरात लावण्यात येवुन आदिवासी विकासाच्या विविध योजनांना त्यांचे नाव देण्यात यावे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती ॲड.पाडवी यांनी यावेळी दिली.

बिरसा मुंडाख्वाजा नाईकउमाजी नाईक, तंट्या भिल्लराणी दुर्गावतीराघोजी भांगरे इ.  क्रांतिकारकांनी आदिवासी समाजासाठी कार्य केले. त्यांचे नाव इतिहासात पाहायला मिळते. जयपाल सिंग मुंडा यांच्यावर बिहारझारखंड या राज्यांत अनेक पुस्तके लिहिली गेली आहेतपुस्तकांच्या माध्यमातून अनेक लेखकांनी जयपाल सिंग मुंडा यांचे कार्य भारतीय समाजामध्ये विशेषत: आदिवासी समाजामध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातही या पुस्तकांचे अनुवाद करून त्याद्वारे त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा मानस ॲड. पाडवी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

आमदार श्री.पाटील म्हणालेजयपाल सिंग मुंडा हे उत्कृष्ट संसदपटूहॉकीपटू होते. ते भारतीय हॉकी संघाचे कर्णधार असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली ऑलिम्पिकमध्ये भारतास पहिले सुवर्ण पदक सन 1928 ला मिळाल्याची माहिती देवून जयपाल सिंग मुंडा यांच्या नावे राज्यात विद्यापीठ असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जयंत जयपाल सिंग मुंडा म्हणालेआदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे तसेच रुढीप्रथापरंपरा आहेत त्यांची जपणूक केली पाहिजे. आदिवासी हे मूळ निवासी आहेत. आदिवासींची जमीन हीच त्यांची ओळख आहे. आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. त्यांनी आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत. परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.आर.के. मुटाटकर म्हणालेमाजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंची आदिवासी विकासाबाबतची पंचशील तत्वे आदिवासी समाजाने  स्वीकारुन आपला शाश्वत विकास करावा.

जयपाल सिंग मुंडा यांच्या भाषणातआदिवासी हे प्रथम श्रेणीचे भारतीय नागरिक आहेत’, असा उल्लेख करीत असल्याचे सांगून जयपाल सिंग मुंडा हे संपादकखेळाडूशिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. ते खासदार होते. तसेच भारतीय सिव्हील सर्व्हिस (ICS) परीक्षा उत्तीर्ण होते, अशी माहिती डॉ.गणेश देवी यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अनुप कुमार यादव यांनी केले तर आयुक्त राजेंद्र भारुड यांनी आभार मानले. या परिसंवादांस देशभरातून पाच हजार लोकांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली. 

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/332ygVv
https://ift.tt/3JCp0sl

No comments:

Post a Comment