पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात; ३ ठार, २० जण जखमी - latur saptrang

Breaking

Thursday, January 13, 2022

पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात; ३ ठार, २० जण जखमी





 कोलकाता: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे आज सायंकाळी ५ वाजता रेल्वे रुळावरुन एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. गुवाहाटीहून जाणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसचे उत्तर बंगालमधील कूचबिहार आणि जलपाईगुडी दरम्यान डोमोहनीजवळ मायागोरी येथे ४-५ डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण १२ डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.



अपघातातील मृतांची नेमकी संख्या आद्याप अद्याप समजू शकलेली नाही. पण अपघाताची तीव्रता पाहता अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. उलटलेल्या डब्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी अडकले असून अनेक जखमी झाले आहेत.

ट्रेन क्रमांक १५६३३ बिकानेर एक्सप्रेस मंगळवारी रात्री राजस्थानमधील बिकानेर येथून निघाली होती. गुरुवारी सकाळी ५.४४ वाजता ही ट्रेन पाटणा रेल्वे स्थानकातून निघून दुपारी २ वाजता किशनगंजला पोहोचली आणि तेथून गुवाहाटीकडे रवाना झाली. भारतीय रेल्वेने ८१३४०५४९९९ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. अजूनही अनेक लोक ट्रेनमध्ये अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

रेल्वेने दिली माहिती; अपघात ३ ठार, ५ लाखाची मदत जाहीर

रेल्वे अपघातात ३ ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी झालेल्यांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना १ लाखांची मदत घोषित केली आहे. किरकोळ जखमींना २५,००० रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.


दरम्यान, या भीषण रेल्वे अपघाताची रेल्वे मंत्रालयाने दखल घेतली आहे. तसंच या प्रकरणी रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली आहे. रेल्वे हेल्पलाइन नंबरही जारी केले आहेत. Railway Helpline numbers - 03612731622, 03612731623

पाटणा रेल्वे स्थानकावरून या एक्स्प्रेसमध्ये ९८ प्रवासी चढले होते. तर ३ प्रवासी मोकामा आणि २ बख्तीयारपूर येथून चढले होते, अशी माहिती पाटण्यातील आरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याने दिली.


मदत आणि बचावकार्यासाठी NDRF च्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत. या टीम लवकरच घटनास्थळी दाखल होतील, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांनी दिली.

No comments:

Post a Comment