मुंबई, दि. ३ :- स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या वतीने साजरा करण्यात येणारा ‘सावित्री उत्सव’ आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानालाही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, क्रांतिज्योति सावित्रीबाई यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान चिरंतन असे आहे. सावित्रीबाईंच्या कर्तृत्वामुळेच स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला झाला. या शिक्षित पिढ्यांतून आलेल्या अनेक माता-भगिनी, विदुषींनी आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत मोठा आणि अभिमानास्पद असा वाटा उचलला आहे. आपल्या कर्तबगारीने महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. यापुढेही स्त्रीशिक्षण, महिला सक्षमीकरण यात राज्य अग्रेसर राहील यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी सावित्रीबाईंच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान, गौरव वाढेल याकरिता अनेकविध योजना, उपक्रम राबवण्यावर भर राहील हेच त्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3zhJiSU
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment