महाराष्ट्र उदय बाँड २०२२ ची परतफेड - latur saptrang

Breaking

Monday, January 10, 2022

महाराष्ट्र उदय बाँड २०२२ ची परतफेड

मुंबईदि. 10 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 7.33 टक्के आणि 7.38 महाराष्ट्र उदय बाँड 2022 ची परतफेड दि.10 फेब्रुवारी 2022 रोजी आहेअसे वित्त विभागातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसूचना क्र. एलएनएफ-१०,११/प्र.क्र.२/अर्थोपा दि. 10 फेब्रुवारी 2017 अनुसार 7.33 आणि 7.38टक्के महाराष्ट्र शासन उदय बाँड2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 9 फेब्रुवारी2022 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 10 फेब्रुवारी2022 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. तसेच अधिसूचना क्र. 3134 आणि अधिसूचना क्र.2487, MIS 10.17 प्र.क्र.11 सरकारी प्रतिभूती अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापिबँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी7.33 आणि 7.38 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2022 च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत:

” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित) बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/33lvzyv
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment