एन.डी.पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख - latur saptrang

Breaking

Monday, January 17, 2022

एन.डी.पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. 17 : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

प्रा. एन डी पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींना त्यांनी नेतृत्व प्रदान केले.  राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणून दीर्घ काळ काम करणारे प्रा. पाटील आदर्श लोकप्रतिनिधी होते.  त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत. दिवंगत प्रा. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

०००००

Maharashtra Governor condoles demise of Prof N D Patil

Mumbai Dated 17 : The Governor of Maharashtra Bhagat Singh  Koshyari has expressed condolences on the demise of senior leader of the Peasants and Workers Party Prof N D Patil.

In a Condolence message, the Governor said, “Prof N D Patil was a strong leader who dedicated his life to fight for the causes of the common people, workers and farmers. He was a model people’s representative having served as a Member of the State Legislature for a long period. Prof. Patil was associated with various educational institutions and led numerous movements and agitations. In his demise the State has lost a sincere and dedicated voice of the people. I pay my respects to the departed leader and convey my deepest condolences to the members of the bereaved family.”

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3A2WPyg
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment