औरंगाबाद : राज्यात कोविड बाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परत ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे (online education)लागत आहे.या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (mla satish chavan)यांनी रविवारी (ता.१६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thakrey) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शाळांना वारंवार (school closed)अशा प्रकारचा ‘ब्रेक’ लागत राहिला तर याचा विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना मुक्त गावे; तर शहरातील कोरोनामुक्त हद्दीतील शाळा, महाविद्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू करावेत(schools open for 50 percent capacity), अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment