मुंबई, दि.२४ : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सकाळी ११ वाजता जे.जे रूग्णालयात येऊन प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घेतली.
यावेळी जे.जे रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रणजीत माणकेश्वर, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय सुरासे आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी व निवासी वैधकीय अधिकारी डॅा.दिलीप गवारी डॅा. संयुक्ता शिंदे, डॉ.चिराग सोनकुसरे, मेट्रन श्रीमती बेलदार, परिचारिका श्रीमती कल्पना मोरे उपस्थित होते.
राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्याबरोबरच आरोग्य कर्मचारी, कोविडकाळात आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सध्या वेगवेगळ्या केंद्रावर प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक मात्रा दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येते.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3GVvwIB
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment