मुंबई, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी मुंबई शहराच्या अपर जिल्हाधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी (करमणूक कर) रविंद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कल्याण पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/32yCioR
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment