Maharashtra Lockdown :राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवारांसह अन्य दोन मंत्र्यांचे संकेत - latur saptrang

Breaking

Sunday, January 2, 2022

Maharashtra Lockdown :राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवारांसह अन्य दोन मंत्र्यांचे संकेत

 


Maharashtra Corona Omicron Lockdown Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे देखील रुग्ण वाढत चालल्याने राज्याची चिंता वाढली आहे. तसेच जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळं राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. 


कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचं चित्र गेल्या चार दिवसांत दिसू लागल्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. लोकांनी निर्बंध पाळले नाहीत तर लॉकडाऊन अटळ असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊनचे ढग अधिक गडद होऊ लागलेत.

No comments:

Post a Comment