पूर्णा नदीच्या पात्रात 6 किलोमीटर पायी चालून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अधिकाऱ्यांनी केले सर्वेक्षण - latur saptrang

Breaking

Monday, February 14, 2022

पूर्णा नदीच्या पात्रात 6 किलोमीटर पायी चालून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अधिकाऱ्यांनी केले सर्वेक्षण



 पूर्णा नदीच्या पात्रात 6 किलोमीटर पायी चालून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अधिकाऱ्यांनी केले सर्वेक्षण


सर्वेक्षणाचे काम पूर्ण ; पूर्णा नदीपात्रात उभारण्यात येणार 7 अत्याधुनिक बॅरेजेस


येत्या एप्रिल मध्ये कामाला होणार सुरुवात - राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती


          सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात बॅरेजेस बांधण्याच्या कामाचे आज अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत भवन ते केऱ्हाळा  खोडकाईवाडी असे जवळपास 6 किलोमीटर नदीपात्रात पायी चालत बॅरेजेस च्या नियोजीत जागेची पाहणी केली.


      सिल्लोड ते कन्नड हद्दीपर्यंत पूर्णा नदीच्या पात्रात एकूण 7 बॅरेजेस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च अखेर बॅरेजेस उभारण्यासाठीचे सर्व प्रशासकीय कारवाई पूर्ण होवून येत्या एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. सदरील बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 33 किलोमीटर पर्यंत पाणी अडवून यातून 54 टक्के सिंचन क्षेत्रात वाढ होईल यामुळे निश्चितपणे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.


    नदीपात्रात पाहणी करतांना उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर,शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे , तहसीलदार विक्रम राजपूत,प.स. सभापती डॉ. संजय जामकर, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, नॅशनल सुत गिरणीचे उपाध्यक्ष नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे,सयाजी वाघ, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, उपविभागीय अभियंता मिलिंद नाकाडे, शाखा अभियंता शेख रज्जाक, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी यतीन कोठावळे, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे, एकनाथ शेळके, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष महाजन, स्थापत्य अभियंता प्रसाद ठाकरे, भूमी अभिलेख विभागाचे योगेश संकपाळ, कैलास पुरे,कृषी सहाय्यक योगिता मनसोटे, सारिका पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सागर ईखनकर, अरुण कोतकर यांच्यासह माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, नगरसेवक विठ्ठल सपकाळ,विश्वास दाभाडे, युवासेनेचे धैर्यशील तायडे, प्रवीण मिरकर,अक्षय मगर, नाना पा.कळम , शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शांताबाई कावले, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, नगरसेवक शेख सलीम हुसेन, चेअरमन राजू बन्सोड,  रमेश साळवे, संतोष धाडगे, संजय मुरकुटे, फहिम पठाण, जगन्नाथ कुदळ, विजय खाजेकर, सुनील लांडगे, अमित कळम, शिवाजी दाभाडे, रावसाहेब कळम, दिलीप जाधव, साहेबराव दिवटे, विश्वास भोसले, योगेश दिवटे, सुभाष लोणकर, पंडित कोके, दत्ता कुडके,बाबुराव दुधे, लाद्दु पटेल, हनिफ मुलतानी, जमीर मुलतानी, रिजवान मुलतानी, नारायण हाडोळे, विलास वाघ, गफ्फार शेख, अस्लम मुलतानी आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment