Asaduddin Owaisi : असउद्दीन ओवेसींनी नाकारली झेड दर्जाची सुरक्षा! - latur saptrang

Breaking

Friday, February 4, 2022

Asaduddin Owaisi : असउद्दीन ओवेसींनी नाकारली झेड दर्जाची सुरक्षा!

awsi


 नवी दिल्ली : आपल्यावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांवर गैरकृत्य प्रतिबंधक कायदा अर्थात युएपीएअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी लोकसभेत केली. उत्तर प्रदेशातील मेरठहून दिल्लीकडे परतत असताना हापूडजवळ दोन युवकांनी ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केला होता. माझ्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. हे लोक कट्टर कसे झाले? अखेर हे कोण लोक आहेत, जे बॅलेटवर नाही तर गोळ्यांवर भरोसा करतात. हे लोक घटनेच्या विरोधात आहेत, असे ओवेसी म्हणाले. (Asaduddin Owaisi)

गोळीबार करणार्‍यांवर युएपीए का लावला जात नाही, असे सांगून ओवेसी म्हणाले की, हरिद्वार, रायपूर, अलाहाबाद येथे माझ्याविरोधात खूप काही बोलले गेले. मी मृत्यूला घाबरत नाही. एक दिवस सर्वांना मरण येणार आहे. मला सुरक्षा नको आहे, आपणास दबावाखाली नाही तर खुले आयुष्य जगायचे आहे. झेड दर्जाची सुरक्षाही आपणास नको आहे. (Asaduddin Owaisi) एमआयएम अध्यक्ष असासुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर प्राणघातक झाला आहे. त्यांनी गाडीवर हल्ला झाल्याचे ट्विट करून माहिती दिली आहे.दरम्यान, एमआयएम अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ट्विट करून म्हटले की, माझ्या गाडीवर छिजारसी टोल गेटवर गोळीबार झाला. ४ राऊंड गोळीबार. तेथे ३-४ जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अलहमदुलिल्लाह.

दरम्यान, ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलेल्या दोन आरोपींकडून उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन देशी पिस्तूल ताब्यात घेतले. सचिन नावाच्या आरोपीने हे पिस्तूल खरेदी केले होते. ओवेसी यांच्या मेरठमध्ये झालेल्या सभेतही हे दोन्ही आरोपी हजर होते व गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. गोळीबार केल्यानंतर पोलिसांना शरण जाण्याची आरोपींची योजना होती, मात्र ओवेसी यांच्या गाडीच्या चालकाने गाडी भरधाव नेल्याने आरोपींची योजना फसली होती, असा पोलिसांचा दावा आहे. ओवेसी आणि त्यांचा बंधू अकबरुद्दीन यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे आरोपी नाराज होते. दोन्ही ओवेसी बंधू हिंदुंच्या धार्मिक आस्थांशी खेळत असल्याचे आरोपींना वाटत होते. वैचारिकदृष्ट्या दोन्ही आरोपी कट्टर होते, त्यातून त्यांनी हल्ल्याची योजना आखली होती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.


No comments:

Post a Comment