Bird flu : राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; ठाण्यातील पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या दगावल्या
ठाणे: राज्यातील करोनाचं संकट दूर होत असतानाच, आता नवे संकट उभे ठाकले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या वेशीवरील ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. शहापूर तालुक्यातील एका पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्या आहेत. कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूच्या संसर्गाने झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती मिळते. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोल्ट्रीपासून एक किलोमीटर परिसरातील जवळपास २५ हजारांहून अधिक कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते.
एएनआयच्या वृत्तानुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वेहळोली गावात एका पोल्ट्री फार्ममधील १०० हून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. अचानक हा प्रकार घडला. बर्ड फ्लूची भीती असल्याने कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश जे. नार्वेकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment