विद्यापीठ कायद्यातील काळे बदल मागे घ्या अन्यथा मंत्र्यांचे दौरे अडवणार -अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री पवन बेळकोने - latur saptrang

Breaking

Friday, February 18, 2022

विद्यापीठ कायद्यातील काळे बदल मागे घ्या अन्यथा मंत्र्यांचे दौरे अडवणार -अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री पवन बेळकोने




 विद्यापीठ कायद्यातील काळे बदल मागे घ्या अन्यथा मंत्र्यांचे दौरे अडवणार -अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री पवन बेळकोने 

लातूर/प्रतिनिधीः- महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचे महापाप विद्यापीठ कायद्यात बदल करुन माविआ सरकारने केले आहे. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करुन विद्यापीठाचा लिलाव करण्याचे योजिले आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठं राजकारणाचा अड्डा बनवण्याचं स्वप्न हे सरकार पूर्णत्वास नेत आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर हे सरकार समाजकारण ८०% आणि राजकारण २०% याचा दिखावा करणारं असून आज शिक्षण क्षेत्र पण राजकरणापासून दूर ठेवू शकले नाहीये. शिक्षण क्षेत्र ( विद्यापीठे ) वसुली केंद्र करण्याच्या नादात त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना विधिमंडळात केलेली आहे. विद्यापीठ कायद्यात बदल या शासनाने घडून आणला आहे. या बाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे तीव्र स्वरूपात भोंगानाद आंदोलन करत मा. मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले. या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील काळे बदल लवकरात लवकर परत घ्यावेत अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यभर एकाही मंत्र्यांचे दौरे होऊ देणार नाही असे देवगिरी प्रदेश सहमंत्री पवन बेळकोने यांनी सांगीतले. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रियंका कोंडेकर, महानगरमंत्री प्रसाद मुदगले, अमित शिंदे व ओमकार गुंतापल्ले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी मोठ्या संख्येने छात्रशक्ती उपस्थित होती.

No comments:

Post a Comment