नाशिक :- आयमा संघटनेची नुकतीच निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांनी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, उद्योजक धनंजय बेळे, नवनियुक्त अध्यक्ष अध्यक्ष निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस ललित बूब, चिटणीस योगिता आहेर, गोविंद झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे, कार्यकारणी सदस्य जितेंद्र आहेर, जयदीप अलीमचंदानी, सुमित बजाज, हर्षद बेळे, अविनाश बोडके, हर्षद ब्राह्मणकर, गौरव धारकर, सुदर्शन डोंगरे, विराज गडकरी, राहुल गांगुर्डे, मेघा गुप्ता, जयंत जोगळेकर, हेमंत खोंड, अविनाश मराठे, विनायक मोरे, राधाकृष्ण नाईकवाडे, जयंत पगार, जगदीश पाटील, करणसिंग पाटील, देवेंद्र राणे,मनीष रावल, दीलीप वाघ, प्रमोद वाघ, रवींद्र झोपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment