मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्य विभागाचे सहसंचालक विजय कंदेवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. १ मार्च आणि बुधवार, दि. २ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी टेलिमेडिसिन सुविधा, ई-संजीवनी ओपीडी सेवा, आरोग्यवर्धिनी टेलिकन्सल्टेशन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.विजय कंदेवाड यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/tMTG89n
https://ift.tt/40wLbrD
No comments:
Post a Comment