एएमआयमचे अध्यक्ष असदोद्दीन आवेसी यांच्या झालेल्या हल्ल्याचा परळी एमआयएम तर्फे जाहिर निषेध - latur saptrang

Breaking

Friday, February 4, 2022

एएमआयमचे अध्यक्ष असदोद्दीन आवेसी यांच्या झालेल्या हल्ल्याचा परळी एमआयएम तर्फे जाहिर निषेध





दि. ०३/०२/ २०२२ रोजी AIMIM पार्टीचे सर्वेसर्वा तथा बॅरिस्टरखा. असोदोद्दीन आवेसी साहेब यांच्यावर छिजारसी टोल गेटवर काही समाजकंठक लोकांनी त्याच्यावर जिवघेणी हल्ला केला, परंतु सुदैवाने ते त्याच्यातुन वाचले व त्याच्या वाहनावर चार राऊंड फायर झाले व त्यांचा जिव घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही दिल्ली मेथे त्यांच्या राहत्याघरावर विघातक हल्ला करण्मात आला होता, असे वारंवारच्या हल्ल्यामुळे देशातील CBI व Intelligence अकार्मक्षफ झाल्माचे संदेश सर्वदुर समाजात पसरत आहे तसेच ज्या व्यक्तीला उत्तम संसदपड म्हणुन पुरस्कारीत केले व एका राष्ट्रीम पक्षाचे राष्ट्रीम अध्यक्ष असतांना त्यांच्या सोबत अशा निर्दनीम घटना घडने ही बाब अत्यंत संशयकारक आहे. या सदरील घटनेचा आम्ही AIMIMपक्षातर्फे तिव्र निषेध नोंदवत असून आमची मागणी आहे की, खा. असोदोद्दीन आवेसी साहेब यांना Z+ Security गृहमंत्रालयाकडून त्वरीत देण्यात यावी तसेच या हल्यामागील दोषींना त्वरीत अटक करण्यात येऊन त्यांना कठोर शासन करण्मात यावे तसेच आगामी उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पडाव्यात, कायदा व सुव्यस्था कायम रहावी मा उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठविण्यात यावे, कायदा व सुव्यवस्था कायम करण्यात यावी म्हणुन आज रोजी लोकशाही मार्गाने लढा देऊन आम्ही जिल्हाधिकारी मार्फत निवेदन आपल्या सेवेत पाठवित आहोत व जाहिर निषेध व्यक्त करीत आहोत. निवेदनावर अकबर अब्दुल शुकुर कच्छी शहराध्यक्ष एमआयएम परळी वै. यांची स्वाक्षरी आहे..

No comments:

Post a Comment