मिठी नदी प्रकल्पाबद्दल मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे राज्यपालांसमोर सादरीकरण - latur saptrang

Breaking

Thursday, February 17, 2022

मिठी नदी प्रकल्पाबद्दल मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे राज्यपालांसमोर सादरीकरण

मुंबई, दि. 17 : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर मिठी नदी विकास, प्रदूषण नियंत्रण व पुनरुज्जीवन या विषयावर सादरीकरण केले. राज्यपालांनी सदर कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी श्री. चहल यांनी राज्यपालांना सन 2005 मध्ये मिठी नदीला आलेल्या पुरानंतर पालिकेने मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या कामाची विस्तृत माहिती दिली.

नदीतील गाळ उपसण्याचे आतापर्यंत झालेले कार्य, संरक्षक भिंतीच्या बांधकामाची स्थिती तसेच नदीच्या रुंदीकरणाची व खोलीकरणाची माहिती त्यांनी यावेळी राज्यपालांना दिली. सन 2006 च्या तुलनेत आज मिठी नदीची परिवहन क्षमता 3 पटींनी वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मिठी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेतर्फे केल्या जात असलेल्या कामाची देखील त्यांनी राज्यपालांना माहिती दिली.  यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू देखील उपस्थित होते.

००००

BMC Commissioner makes presentation on Mithi River work before Governor

 Mumbai 17 : Municipal Commissioner I S Chahal made an elaborate presentation on the ‘Mithi River Development, Pollution Control and Rejuvenation’ before State Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Thursday (17th Feb).

 Mentioning about the devastation caused by the flooding of the Mithi river in 2005, the Commissioner apprised the Governor of the work of regular desilting of the river before monsoon, widening and deepening of the Mithi river and construction of the Retaining Wall undertaken by the BMC as per directions of the Mithi River Development and Protection Authority.

The Commissioner told the Governor that the Conveyance Capacity of the river had increased 3 times compared to 2005. He also informed the Governor of the efforts being made for controlling the pollution and for improving the quality of water of the river. Additional Municipal Commissioner P Velrasu was also present.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/qmyBXvo
https://ift.tt/O5oIAD6

No comments:

Post a Comment