आ संभाजी पाटील व आमदार रमेश कराड यांनी इतर साखर कारखान्यावर धरने आंदोलन करण्यापेक्षा जिल्ह्यातील बंद पडलेले एक एक कारखाने चालवायला घ्यावे - latur saptrang

Breaking

Sunday, February 20, 2022

आ संभाजी पाटील व आमदार रमेश कराड यांनी इतर साखर कारखान्यावर धरने आंदोलन करण्यापेक्षा जिल्ह्यातील बंद पडलेले एक एक कारखाने चालवायला घ्यावे





 आ संभाजी पाटील व  आमदार रमेश कराड यांनी इतर साखर कारखान्यावर धरने आंदोलन करण्यापेक्षा जिल्ह्यातील बंद पडलेले एक एक कारखाने चालवायला घ्यावे


जयजवान अंबुलगा साखर कारखाना भाडेतत्वावर चालवा



जिल्हा एन एस यू आय चे अध्यक्ष शरद देशमुख 

    


 लातूर   :-  राज्यात लातूर जिल्ह्यामधील अति उत्तम चालणाऱ्या कारखान्याच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यापेक्षा  लातूर जिल्ह्यातील जयजवान सहकारी साखर कारखाना नळेगाव व निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी सहकारी साखर कारखाना आमदार संभाजी पाटील  निलंगेकर व आमदार रमेश कराड यांनी कारखाने भाडेतत्वावर घेवून कारखाने चालु करावेत यासंदर्भात दोन दिवसापूर्वी राज्य सहकारी बँकेने भाडेतत्त्वावर देण्याची निवीदा निघाली काढली असून  या सन्माननीय भाजपाच्या आमदार महोदयांनी एक एक कारखाना चालवायला घेउन साखर कारखानदारीत एक नवीन आदर्श निर्माण करावा अशी भावना भाजपचे कार्यकर्ते खाजगीत व्यक्त करत आहेत .चांगले चालणाऱ्या साखर कारखान्याच्या गेटवर धरणे आंदोलन करण्यापेक्षा स्वतः कारखाने चालवून शेतकऱ्यांच्या उसाला अधिक भाव देता येईल .अशी त्यांच्या जवळील समर्थकांची भावना असुन आ संभाजी पाटील व आ रमेश कराड यांनी समर्थकाच्या भावनेची कदर करावी व कारखानदारीत आदर्श निर्माण करावा . असे आवाहन एन एस यू आय चे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे .


जिल्ह्यातील साखर कारखान्याचे गाळप भाव अतिशय चांगले


एकीकडे जिल्ह्यातील साखर कारखानदारी व्यवस्थित चालु असताना केवळ राजकीय द्वेशापोटी आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या आमदारांनी बंद पडलेले साखर कारखाने भाडेतत्वावर सुरू करावेत अधिक भाव द्यावा चांगला आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा अंबुलगा, नळेगाव भागांतील लोकांची आहे .

No comments:

Post a Comment