रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम - latur saptrang

Breaking

Friday, February 25, 2022

रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम



 रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम


जिल्ह्यात 1 लाख 29 हजार 748 बालकांना पाजला जाणार पोलिओ डोस


- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार


 


हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात आरोग्य  विभागाच्या वतीने  रविवार दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून  0 ते 5 वर्ष वयोगटातील 1  लाख 29 हजार 748  बालकांना पोलिओचा डोस पाजला जाणार असल्याची माहिती   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.


राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 23 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात येणार होती, मात्र कोरोना प्रादुर्भाव व ओमिक्रॉन व्हेरियंटचे प्रमाण वाढल्याने हा कार्यक्रम तात्पुरता रद्द करुन पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार आता रविवार, दिनांक 27 फेब्रुवारी, 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याने आरोग्य विभागाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी शहरी भागात  व ग्रामीण भागात असे एकूण 1175 बूथची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 3128  कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.  


दरम्यान बस स्थानक, रेल्वे स्टेशन, नवीन बांधकाम साईट, रस्त्या शेजारील पाले , विटभट्टया आदी ठिकाणी पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी एक दिवस अगोदर  सर्व शाळांनी  प्रभात फेरी काढुन राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस सहकार्य करणार आहेत.  तसेच मंदिर व मस्जीद वरुन ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात येत आहे, सर्व पाच वर्षाखालील बालकांना पोलचिट वाटप करण्यात आले  आहेत.  


राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम  राबविण्यासाठी  61 वैद्यकीय अधिकारी, 24 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, तसेच 9 जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment