गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड - latur saptrang

Breaking

Sunday, February 6, 2022

गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

 


गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

मुंबई; : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. त्यांची कालपासून (ता.०६) प्रकृती पुन्हा बिघडल्याने चिंताजनक झाली. काल त्यांनी उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्याची माहिती ब्रीच कॅन्डी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी यांनी दिली होती. तसेच त्याला लता दीदींच्या भगिनी आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही दुजोरा दिला होता.

दुसरीकडे रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.

लतादीदींना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनानंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांचे व्हेंटिलेटर तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले.

काल केंद्रीय मंत्री पियूष गोयल, लतादीदींचे बंधू आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदींनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयास भेट देऊन लतादीदींच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारणा केली. लता मंगेशकर  लवकरात लवकर बर्‍या व्हाव्यात असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुटुंबीयांना देण्यास सांगितल्याची माहिती पियूष गोयल यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment