पेट्रोल-डिझेल महागणार! सौदीच्या निर्णयाचा फटका
महागाईच्या दिवसात सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज (7 फेब्रुवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशात तीन महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सलग 95 दिवस इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. (Check Today's Petrol Diesel Price Updates)
सामान्यांना महागाईने हैराण केले असतानाच सौदी अरामकोने अशियासाठी देण्यात येणाऱ्या क्रूड ग्रेडच्या दरात वाढ केलीय. सौदी अरामकोने आशियातील तेल ग्राहकांसाठी क्रूड ॲाइलच्या दरात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये 60 सेंट प्रति बॅरल दरामध्ये वाढ केलीय. रॉयटर्सने जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये, किमतीतील ही वाढ आशियातील मजबूत मागणी दर्शविते. यामुळे कंपन्या गॅसोइल आणि जेट इंधनात जास्त फायदा कमावत असल्याचे दिसते, असे म्हटले आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे जर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उत्तर पाहायला मिळाला तर याचा थेट परिणाम भारतातील इंधनांच्या किमतीवर पडू शकतो.
आजही पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 03 नोव्हेंबर रोजी उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) शनिवारी पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यात (Pune) पेट्रोलचे दर 109.72 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.50 रुपये प्रति लीटरवर आहे. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील इतर शहरामधील इंधनाचा दर काय आहे.
तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल
- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये
- मुंबई-109.98- 94.14 रुपये
- पुणे- 109.72- 92.50 रुपये
- नाशिक- 109.79-92.57 रुपये
- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये
- अमरावती- 111.14- 93.90
- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये
- नागपूर- 110.10-92.90 रुपये
- सातारा- 110.03-93.88 रुपये
- सांगली-109.65-92.83 रुपये
- वाशिम- 110.71-93.49 रुपये
- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये
- रायगड- 109.48- 92.25 रुपये
- सोलापूर- 110.57-93.34 रुपये
- सांगली- 110.03-92.83 रुपये
- कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये
- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये
-परभणी- 112.49-95.17 रुपये
- पालघर- 109.75-92.51 रुपये
- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये
अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा
या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल
No comments:
Post a Comment