नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा - latur saptrang

Breaking

Tuesday, February 22, 2022

नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा



 नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शहरातील उपजिल्हा रुग्णालयात भव्य रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यासोबतच येथील रुग्णांना फळ व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. युवासेना तसेच अब्दुल आमेर मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त अब्दुल आमेर यांच्यावर शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात शुभेच्छांचा वर्षाव झाला.


      अब्दुल आमेर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शिवसेना भवन येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच याच ठिकाणी युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने अब्दुल आमेर यांचा लाडू तुला कार्यक्रम घेण्यात आला. 


वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा व आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी असून मला दिलेल्या शुभेच्छा तसेच  जन्मदिवसाचे औचित्य साधून युवासेना व मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल अब्दुल आमेर यांनी आयोजकांचे आभार मानले.


      यावेळी अब्दुल आमेर यांना शुभेच्छा देण्यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, दीपाली भवर, मेघा शाह, युवासेनेचे धैर्यशील तायडे, अक्षय मगर, शेख इम्रान, शिवा टोम्पे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर,शकुंतलाबाई बन्सोड,  राजू गौर, शंकरराव खांडवे, सत्तार हुसेन, मनोज झंवर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, गौरव सहारे, नॅशनल सुत गिरणीचे उपाध्यक्ष नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक विशाल जाधव, मारुती वराडे, अकिल देशमुख, दीपक घरमोडे, गोविंद लाठी, हनिफ मुलतानी, विश्वास दाभाडे, पांडुरंग जैवळ,  राकेश कटारिया, बापूराव काकडे, अब्दुल आमेर मित्र मंडळाचे  अक्षय अग्रवाल, आनंद अग्रवाल, अमन देशमुख, आनंद सिरसाट, सय्यद सोहेल, एजाज कोतवाल, आवेस कोतवाल, अदनान बागवान, जुबेर पठाण, शैबाज देशमुख, अमोल डोभाळ, इसरार शेख, राजू दायमा, अक्षय राऊत, मयूर वाघ, अक्षय वाघ, शैलेश गौर, राधेश्याम अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment