मलिकांवरील ईडी कारवाईनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया - latur saptrang

Breaking

Wednesday, February 23, 2022

मलिकांवरील ईडी कारवाईनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

 

sharad

मलिकांवरील ईडी कारवाईनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज ईडीने ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. (ED raided on Nawab Malik House) या साऱ्या प्रकारावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं मत मांडलं आहे.

शरद पवार यांनी म्हटलंय की, यामध्ये काही नवीन आहे. आज ना उद्या होणारच होतं. जाहीरपणे अनेक विषयांवर नवाब मलिक सतत विरोधात बोलत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. नवाब मलिकांवर ईडी कारवाई करणार याची पुसटशी कल्पना होतीच. ते आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. परंतु हा सत्तेचा गैरवापर होतोय. जे केंद्र सरकारविरोधात बोलतात अथवा केंद्रीय यंत्रणांबाबत बोलतात, त्यांना नोटीस दिली जात आहे. त्यांची चौकशी होते. सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, मुस्लीम असल्याने दाऊदशी संबंध वगैरे आरोप केले जात आहेत. याआधी माझ्यावरही अशाप्रकारचे अनेक आरोप झाले आहेत. पण सिद्ध करू शकले नाहीत, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment