मुंबईच्या धर्तीवर शहरात कर माफी साठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक ६०० चौरस फूट पर्यंतच्या मालमत्तांना कर माफ करण्याची मागणी
औरंगाबाद/यूसुफ पठान : महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी 500 चौ. फूट च्या आतील घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे मात्र औरंगाबाद शहरात ६०० चौ. फूट आकाराच्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे ५०० ऐवजी औरंगाबाद शहरात ६०० चौरस फूट घरांना तत्काळ मालमत्ता कर माफ करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंटच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांना देण्यात आले.
ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष जावेद कुरेशी, माजी नगरसेवक कृष्णा बनकर, मध्य शहर अध्यक्ष अहमद जलीस ह्यांनी नेतृत्व केले.
औरंगाबाद मनपा हद्दीत ६०० स्क्वेअर फुटाच्या आतील घरांची संख्या मोठी आहे त्यातच मागील 2 वर्षांपासून कोविड मुळे नागरिक हवालदिल झालेले असताना ह्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही त्यांनी नमूद केले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, महसूल मंत्री,नगरविकास मंत्री ह्यांना पाठविण्यात आले असून 15 दिवसात शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल समद, शहर महासचिव भगवान खिल्लारे, शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, शहर सचिव शेख शाकेर, शहर सचिव सलिम सिद्दीकी,शहर उपाध्यक्ष मन्नान खान,शहर उपाध्यक्ष नयुम पटेल,आनंद शेजवळ, एस पी मगरे, सईद बाबा पठाण, आदी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment