उमरग्यात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, पंचायत समितीच्या सभापतींवर कारवाईची मागणी
उमरगा (जि.उस्मानाबाद) : पंचायत समितीतील एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला सभापती सचिन पाटील यांनी असंवैधानिक भाषा वापरून अश्लील शिवीगाळ केल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचारी संघटनेने सोमवारी (ता.१४) काळ्या फिती लावून काम केले. सभापतीवर प्रतिबंधात्मक ठोस कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे कि, वरिष्ठ सहायक एच. व्ही. कोळी यांना ११ फेब्रुवारीला उमरगा (Umarga) पंचायत समितीचे सभापती पाटील यांनी अश्लील शिवीगाळ शिवीगाळ केली. या संदर्भात कोळी यांनी कर्मचारी संघटनेकडे अर्जाद्वारे व्यथा मांडली होती. या अगोदरही पाटील यांनी चार वेळा कर्मचारी, अधिकारी यांना त्यांच्या दालनामध्ये बोलावून शिवीगाळ केलेल्या घटना घडलेल्या आहेत. (Abusive Words Use Against Umarga Panchayat Samiti Staff Osmanabad Latest News) याबाबत संघटनेकडुन वेळोवेळी लेखी स्वरुपात कळविण्यात आलेले आहे. संबंधित व्यक्तीच्या कृत्याबाबत प्रशासनास कळवूनही प्रशासनाकडून संघटनेच्या भावनेचा कसल्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला नाही किंवा कसल्याही प्रकारची प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संघटना व्यथित होऊन नाईलाजाने सर्व संघटनेतील कर्मचारी, अधिकारी यांची सुरक्षिततेच्या व आत्मसम्मानाच्या दृष्टिने विचार करून सोमवारी तालुका संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावुन कामकाज करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ठोस कार्यवाही होईपर्यंत तालुका संघटना पर्यायाने जिल्हा संघटनेकडून कामकाज बंद अथवा असहकार्य आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेच्या मागण्यांचा व हिताचा विचार करून सभापती पाटील यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे. पंचायत समिती (Panchayat Samiti) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम.एस. बिडवे, उपाध्यक्ष ए.डी. चिंचोळे, सचिव बी.एम. पवार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
No comments:
Post a Comment