शिवजयंती उत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी
पोलीस स्टेशननिहाय विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
हिंगोली, (जिमाका) दि. 18 : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात तारखेनुसार दि. 19 फेब्रुवारी, 2022 रोजी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. त्याप्रमाणेच हिंगोली शहरात देखील सार्वजनिक शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे.
वरील उत्सवानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात येतो. परंतु या सणाच्या काळात मानापानाचे कारणावरुन किंवा इतर शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. अशा प्रकारे अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता असते. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये हिंगोली जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी, 2022 रोजी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. पोलीस स्टेशननिहाय नियुक्त विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
वसमत शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी अरविंद बोळंगे, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमत येथील महसूल विभागाचे नायब तहसीलद अनिता वडवळकर, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूलचे नायब तहसीलदार पाठक, औंढा ना. पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डॉ. कृष्णा कानगुले, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी जिवक कांबळे, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार सुनिल कावरखे यांनी निुयक्ती त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीसाठी दि. 19 फेब्रुवारी, 2022 रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे, असे आदेश दिलेले आहेत.
No comments:
Post a Comment