रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर - latur saptrang

Breaking

Wednesday, February 2, 2022

रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर



 रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प 

 - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर 
लातूर/प्रतिनिधी:अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात सादर केलेल्या अर्थसंकल्पातून रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे,बेरोजगारी दूर करणारा  हा अर्थसंकल्प आहे,असे मत माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.
   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि.१ फेब्रुवारी)संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प भविष्याचा वेध घेतो. कोरोनानंतरही भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे,हे यात स्पष्ट होते.अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी काही ना काही देण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केले आहे.सर्व घटकांचा समतोल साधताना शेती क्षेत्रात प्रचंड गुंतवणुकीसाठी तरतूद करण्यात आली आहे.शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासाठी २.३७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.आजवरच्या  इतिहासात ही सर्वाधिक तरतूद आहे.
शेतमाल थेट विक्री करून त्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सुरू केल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या असल्याचे आ.निलंगेकर म्हणाले.
   सामान्य नागरिकांसोबतच सहकार व पायाभूत सुविधांच्या विकासाकडेही लक्ष पुरविण्यात आले आहे.पंतप्रधान आवास  योजनेसाठी यात मोठी तरतूद करण्यात आली आहे.प्रत्येक भारतीयाला घर असावे हे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.पायाभूत सुविधा मधून सर्वाधिक उद्योग निर्मिती होते.या क्षेत्रासाठी साडेसात लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी २ लाख कोटी रुपये गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली आहे.संरक्षण क्षेत्रातील  ६८ टक्के उत्पादन देशातच होणार असून या माध्यमातूनही रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.एकुणात देशाला विकासाकडे नेणारा, आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबविणारा आणि सर्व समावेशक असणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आ.निलंगेकर यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment