पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील – निरिक्षक दिलीप खैरे
येवला,(यूसुफ पठान) :- शेतकरी बांधवाना सातत्याने भेडसावत असलेल्या विजेच्या प्रश्नांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न मार्गी लावली जातील अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा येवला विधानसभा मतदारसंघाचे निरिक्षक दिलीप खैरे यांनी दिली.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अदेशान्वये प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निरिक्षक दिलीप खैरे यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे. त्यानुसार आज येवला संपर्क कार्यालयात निरिक्षक दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, विधानसभा अध्यक्ष तथा येवला बाजारसमितीचे प्रशासक सभापती वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर शेवाळे, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नगरसेवक दीपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, यांच्यासह सुनील पैठणकर, संतोष खैरनार, हुसेन शेख, संजय सोमासे, साहेबराव आहेर, प्रभाकर बोरणारे, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी महेंद्र पवार, स्वीय सहाय्यक अशोक गालफाडे, बाळासाहेब लोखंडे, तसेच सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात,अलकेश कासलिवाल,रवींद्र जगताप, भगवान ठोंबरे, धनराज पालवे,मलिक मेम्बर,मुश्ताक शेख,संतोष परदेशी, विजय जेजुरकर, विकी बिवल, विश्वास देवरे, विजय खैरनार, संतोष राऊळ, श्रावण ठोंबरे, तुळशीराम कोकाटे, सचिन सोनवणे, संजय पगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत शेतकरी बांधवाना सातत्याने भेडसावत असलेल्या खंडित वीज पुरवठ्या बाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत वरीष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असे दिलीप खैरे यांनी सांगितले. तसेच येवला विधानसभा मतदारसंघात राष्र्ावादी कॉंग्रेस पार्टीची सभासद नोंदणी अभियान सुरु करून ५० हजार सक्रीय सभासद नोंदणी करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असता यापुढील काळात संबंधित अधिकाऱ्यांना समज देणार असल्याचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment