अंबेजोगाई; : थरकाप उडवणाऱ्या घटना अंबेजोगाई तालुक्यातील बागझरी गावात घडली आहे. येथील धारासुरे कुटुंबियांनी अंड्याची भाजी खाल्ल्याने कुटुंबातील दोन मुलींचा जागीच मृत्य झाला तर उपचारादरम्यान आठ महिन्याचा मुलगा नारायण धारासुरे याची प्राणज्योत मालवली. आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात आई भाग्यश्री धारासुरे हिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
याबाबतची माहिती अशी की, नागझरी परिसरातील शेपवाडी गावच्या हद्दीत काशिनाथ धारासुरे यांचे कुटुंब वास्तवास आहे. रात्रीची अंड्याची शिळी भाजी सकाळी धारासुरे कुटुंबातील सर्व सदस्यांनी खाल्ली. यानंतर श्रावणी काशिनाथ धरसुरे (वय ४) आणि साधना काशिनाथ धरसुरे ( वय ५) दोन्हीना सुरुवातीला मळमळ होऊ लागली आणि यंतर त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या.
तर भाग्यश्री काशिनाथ धरसुरे (वय २८, आई ) आणि त्याचा आठ महिन्याचा मुलगा नारायण काशीनाथ धारासुरे या दोघांची प्रकृती बिघडली. यानंतर सर्वांना आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, श्रावणी व साधना या दोन्ही बहिणीचा वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर मुलगा नारायण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी दिली.
विषबाधेमुळे तीन मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सध्या भाग्यश्रीवर उपचार सुरू आहे
No comments:
Post a Comment