मुंबई, दि. २ : “ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटक्षेत्राने एक अत्यंत देखणा, शैलीदार अभिनेता गमावला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“भारतीय चित्रपट सृष्टीत विशेषतः मराठी चित्रपट क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांपासून ते आजच्या जाहिराती आणि वेब माध्यमापर्यंत सर्व माध्यमांमध्ये रमेश देव यांनी अभिनेता म्हणून आपली छाप सोडली होती. हिंदी चित्रपटांतही त्यांनी विविध भूमिका साकारून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. निर्माता म्हणूनही त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले. त्यांनी रंगभूमीवर अभिनेता आणि निर्माता म्हणून विशेष योगदान दिले होते. त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा, यांच्यासोबत पडद्यावरील त्यांची जोडी रसिकांना विशेष भावली. भरभरून जीवन जगणारे एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/G4rlIaqCj
https://ift.tt/HIjAfVXiW
No comments:
Post a Comment