सामाजिक कार्यकर्ते कवी गोविंद श्रीमंगल यांचा शिवसेनेत प्रवेश - latur saptrang

Breaking

Tuesday, February 1, 2022

सामाजिक कार्यकर्ते कवी गोविंद श्रीमंगल यांचा शिवसेनेत प्रवेश




लातूर : शिवसेनेचे कर्तबगार जिल्हाप्रमुख मा शिवाजीराव माने यांची संबंध जिल्हयात चालू असलेली पक्ष वाढीसाठीची भगवी वाटचाल पाहता जिल्हयातील वैचारिक तथा अनेक क्षेत्रातील मंडळी शिवसेना पक्षाकडे आकर्षित होतांना दिसत असून दैनंदिन पक्षाकडे ईतर पक्षातील कार्यकर्ते या पक्षात प्रवेश करीत आहेत,नुकतेच शि अनंतपाळ येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध कवि गोविंदराव श्रीमंगल यांनी शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक कार्यकर्ते,प्रसिध्द पत्रकार, वैचारिक राजकारणी, शिवसैनिक प्रा सोमनाथ स्वामी डिगोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथे शिवसेनेत प्रवेश केला।
यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी श्रीमंगल यांना भगवी शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून पक्षात प्रवेश दिला, याप्रसंगी शि अनंतपाळ शिवसेना तालुकाप्रमुख भागवतराव वंगे, शिरूर अनंतपाळ शहर प्रमुख सतिष शिवणे राजकुमार वलांडे चंदु हत्ते लातूर तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, औसा तालुकाप्रमुख सतीश शिंदे, तालुका संघटक रोहित कोमदे पाटील, लातूरचे माजी नगरसेवक सतीश देशमुख, सुनील बसपुरे आदी सह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते,
  या दरम्यान प्रा सोमनाथ स्वामी डिगोळकर यांनी शिवसेना पक्ष हा जाती - धर्म न पाळता, उच्च -निच हा भेदभाव न ठेवता सर्व धर्म समभाव जपणारा तमाम भारतीयांना सर्वसामान्य,गोरगरीबांना, न्याय देणारा पक्ष आहे, राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा उध्दवसाहेब ठाकरे हे राज्याचा समतोल शहर व ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी, सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून शासन निर्णय घेत असल्याचे तमाम राज्यातील जनता खुष आहे, सर्वांनी मा उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती व जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांचे पक्ष वाढीचे विचार तमाम शिवसेना पदाधिकारी यांनी व शिवसैनिकांनी घरा-घरात पोहचविण्यासाठी परिश्रम घ्यावे असे नमूद करुन कवी गोविंद श्रीमंगल यांच्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला तसेच यावेळी श्रीमंगल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment