हिजाबप्रकरणावरून राडा.. भगवे शाॅल घेत विद्यार्थी आमने सामने
कर्नाटकातील उडुपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब (Hijab) परिधान करण्याच्या मागणीवरून वाद चांगलाच चिघळताना दिसत आहे. उडुपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेले विद्यार्थी आणि भगवे टोले-हेडगियर घातलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसर्या गटाने कॉलेज कॅम्पसमध्ये घोषणा दिल्याने जोरदार निदर्शने सुरू केली आहे.
महाविद्यालय प्रशासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिकासुध्दा दाखल करण्यात आली होती. आज कर्नाटक उच्च न्यायालय राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदीविरोधातील या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेले विद्यार्थी आणि भगवे टोले-हेडगियर घातलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसर्या गटाने कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू केली आहे.कर्नाटकातील (Karnataka) उडुपी जिल्ह्यातील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये मुस्लीम मुलीनी हिजाब (Hijab) घालू देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. हिजाब परीधान करून वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप या मुस्लीम विद्यार्थिनींनी केला होता त्यानंतर हा वादाला चांगलेच तोंड फुटले होते.
No comments:
Post a Comment