बाळासाहेब थोरातांनी दिली अब्दुल सत्तारांच्या आदेशास स्थगिती - latur saptrang

Breaking

Wednesday, February 16, 2022

बाळासाहेब थोरातांनी दिली अब्दुल सत्तारांच्या आदेशास स्थगिती

 


बाळासाहेब थोरातांनी दिली अब्दुल सत्तारांच्या आदेशास स्थगिती

औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिन्सीतील भूखंड विक्री व्यवहारातील चौकशीचे आदेश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते. त्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीची जिन्सीतील जमीन समितीने नियम बाजूला ठेवून विकली व यात घोटाळा झाल्याची तक्रार डाॅ.दिलावर मिर्झा बेग यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे केली हेती. तसेच जयमलसिंग रंधवा व पुंडलिकअप्पा अंभोरे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. (Balasaheb Thorat Adjourned Abdul Sattar Order On Investigation Of Land Scam)

या प्रकरणी सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने चौकशी पूर्ण झाली होती. आता प्रतिक्षा होती फक्त अहवालाची. या चौकशी आदेशाविरुद्ध औरंगाबाद (Aurangabad)) बाजार समितीच्या वतीने सचिव विजय शिरसाठ यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या अर्धन्यायिक न्यायालयाकडे पुनर्विलोकन अर्ज केला होता. पणन संचालकांच्या संमतीने सदरील व्यवहार झाला आहे. सहकारमंत्र्यांकडे अगोदरच चौकशी सुरु असल्याची बाबीकडे दुर्लक्ष करुन सत्तारांनी चौकशीचे आदेश दिलेत.

No comments:

Post a Comment