सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून ऑनलाईन धान्य वितरण प्रणालीत सुधारणे साठी निवेदन. - latur saptrang

Breaking

Wednesday, February 9, 2022

सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून ऑनलाईन धान्य वितरण प्रणालीत सुधारणे साठी निवेदन.



 सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून ऑनलाईन धान्य वितरण प्रणालीत सुधारणे साठी निवेदन. 

       गेल्या दोन महिन्यांपासून ईपाॅस मशीन मधील अनेक समस्येमुळे दुकानदार वेठीस

सिल्लोड (युसूफ पठान ):-  तहसील कार्यालया,सिल्लोड  epos मशीन च्या समस्येवर उपाय म्हणून जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील सर्वच धान्य वितरण एकत्र व्हावेत म्हणून मशीनवर सर्व धान्य वितरणास उपलब्ध असुन  उपलब्ध धान्यातुन सर्व योजनेतंर्गत वितरण करण्यास परवानगी देण्या बाबत* 

        गेल्या दोन महिन्यांपासून धान्य वितरणात द्वारपोच मधील दिरंगाई व ऑनलाईन वर मशीन मधील अनेक समस्येवर वारंवार मॅसेज देऊन हि न होणार्या सुधारणे मुळे   लाभार्थी यांच्यात गैरसमज होतोय तसेच विविध तक्रारी वाढत आहेत व त्यात दुकानदार वेठीस धरले जात आहेत .मुदत वाढ मध्ये हि मशीन बरोबर न चालत असल्याने लाभार्थीस दिलेल्या नियोजित वेळेत वितरण होतच नाहीत ज्याच्यामुळे दुकानदारच खोट बोलून आपले धान्य देत नाहीत असेच गैरसमज होत आहेत त्यामध्येच जे धान्य वितरणास उपलब्ध आहेत ते काढत असताना cf ,Cree मधुन धान्य ना निघता चुकून रेग्युलर चे धान्य निघाले तर ते धान्य पुढील महिन्यात आल्यावर ते उपलब्ध रहात नाहीत ज्यामुळे लाभार्थीस कोणते धान्य द्यावेत हि समस्या वाढत आहेत तरी या महिन्यात ऑनलाईन सर्वच धान्य एकत्र काढून  द्वारपोच झाल्यावर ग्राहकास देण्याची किंवा उपलब्ध धान्यातुन देण्याची सर्व साठा मशीन मधून उपलब्ध करून देण्याची  द्वारपोच त्वरीत देण्याबाबत आदेश देऊन तत्काल कार्रवाई करावी हि नम्र विनंती. cf, cree योजना असे पर्यंत मशीन वर धान्य साठा nic कडूनच देण्यात यावेत.  समस्येवर निदान निघे पर्यंत किचकट अटी न लावता मंजूरी देऊन pmgky व रेग्युलर चे धान्य वितरणास एकत्र देण्यात यावेत.  मोफत धान्य वितरणाचे थकित कमिशन त्वरीत उपलब्ध करुन द्यावेत.  सर्व दुकानदाराना प्राधिकारपत्र देण्यात यावेत. 

            नसता आमच्या मशीनी तहसील कार्यालयात जमा करून घेऊन सुधारित मशीनी उपलब्ध करून देण्यात याव्यात. या मागणीबाबत नायब तहसीलदार सौ.कमल मनोरे यांच्यासह चर्चेनंतर निवेदन सादर करण्यात आले.निवेदन देताना सिल्लोड तालुकाध्यक्ष रफिक शेरखान यांच्यासह उपाध्यक्ष राधेश्याम कुलवाल, मधुकर बरडे, सचिव पंडित पारधे,कोषाध्यक्ष सलीम बागवान, सहसचिव पंडित गोडसे, शहर प्रतिनिधी अजिज पठाण, महिला प्रतिनिधी मिनाक्षी जितेंद्र माहोर,संजय पिराजी पाटील, ठकुबा काकडे,शेख रब्बानी सह अनेक स्वस्त धान्य दुकानदार हजर होते.



No comments:

Post a Comment