परळी वैजनाथ, : परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहीण -भावाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली.
जिरेवाडी शिवारात नदीलगत असलेल्या शेतात सटवा ग्यानबा मुंडे रा. जिरवाडी ( ६८ ) व त्यांच्या बहीण सुबाबाई ग्यानबा मुंडे (७०) राहत होते. या दोघा बहीण-भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांनी पंचनामा केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पर्यंत हत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच या घटनेने परळी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment