Karnataka Hijab Controversy: कर्नाटकमध्ये हिजाबच्या मुद्यावरून मोठा वादंग माजला आहे. तर, दुसरीकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम आघाडीने कर्नाटकमधील विद्यार्थीनी बीबी मुस्कान खानला पाठिंबा दिला आहे. संघाच्या मुस्लिम आघाडीने म्हटले की, हिजाब अथवा पर्दा हा भारतीय संस्कृतीचा हिस्सा आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने हिजाब परिधान करणे आणि बीबी मुस्कानच्या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्याशिवाय बीबी मुस्कान खान कॉलेजमध्ये जात असताना झुंडीने दाखवलेला उन्माद निंदनिय असल्याचे म्हटले.
आम्ही मुस्लिम विद्यार्थीनीसोबत
मुस्लीम राष्ट्रीय मंचचे अवध प्रांत संचालक अनिल सिंह म्हणाले की, ती आमच्या समाजाची मुलगी आणि बहीण आहे. तिच्या या संकटाच्या वेळी पाठीशी उभे आहोत. मुस्लिम राष्ट्रीय मंचने आपल्या निवेदनात म्हटले, हिंदू संस्कृती महिलांचा आदर करण्यास शिकवते आणि ज्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा देत मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा होता.
मुलींना हिजाब परिधान करण्याचे घटनात्मक स्वातंत्र्य असल्याचेही मुस्लिम राष्ट्रीय मंचाने म्हटले. विद्यार्थीनींनी शैक्षणिक संस्थेच्या ड्रेस कोडचे उल्लंघन केले असल्यास त्या संस्थेला त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे. भगवं उपरण घालून आणि जय श्रीरामच्या घोषणा देत केलेले वर्तन निंदनीय असून त्यांनी हिंदू संस्कृतीला बदनाम केले असल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचाने म्हटले आहे.
Javed Akhtar on Hijab Row: हिजाब विवाद पर बोले जावेद अख्तर- मैं बुर्का के पक्ष में नहीं, लेकिन लड़कियों को डराना क्या मर्दानगी है
हिजाब भारतीय संस्कृतीचा भाग
हिजाब किंवा बुरखा हा देखील भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे आणि हिंदू महिला त्यांच्या आवडीनुसार पदर घेतात आणि हीच बाब बीबी मुस्कानलाही लागू होते, असेही सिंह यांनी म्हटले. मुस्लिम आमचे बांधव आहेत आणि दोन्ही समुदायांचा डीएनए एकच आहे असे सरसंघचालकांनी म्हटले होते. त्यावेळी मी हिंदू समाजातील सदस्यांना आवाहन करतो की त्यांनी मुस्लिमांना आपले बांधव म्हणून स्वीकारावे असे आवाहनही सिंह यांनी केले.
No comments:
Post a Comment