पाटण; सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी भुकंपाचे धक्के बसले. आज (दि.१) मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप कोयना धरण परिसरात झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून ९.६ किलोमीटर अंतरावर काडोली गावच्या पश्चिमेस ७ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना भूकंप मापन केंद्रावरून देण्यात आली. (Koyana earthquake)
मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता हा ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
याशिवाय या भूकंपामुळे पाटण तालुक्यातही कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Koyana earthquake)
तथापी या भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता भलेही ३.३ इतकी कमी असली तरी कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर हा धक्का जाणवल्याने काहीकाळ भितीचे वातावरण निर्माण झाले.
हा भूकंप कोयनेसह सातारा, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जाणवल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment