PM मोदींचा घणाघात, महाराष्ट्रातून परप्रांतियांना पिटाळून लावले
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत. पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरू करण्यापूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. लतादीदींनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. त्यांनी देशाला एकजूट केली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
- करोना संकटात जो जिथे आहे, त्याने तिथेच राहावं, अशा सूचना दिल्या गेल्या. पण महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडी सरकारने स्थलांतरीत मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटं दिली आणि राज्यातून पिटाळून लावलं. त्याचवेळी दिल्ली सरकारने स्थलांतरीत मजुरांना राजधानी सोडण्यास सांगितलं. बस उपलब्ध करून दिल्याः पंतप्रधान मोदी
- करोनामुळे जागतिक परिस्थिती बदलली आहे. यामुळे भारताने स्वतःला कमी न लेखता आणि नेतृत्व म्हणून पुढे गेले पाहिजे. भारताने ठामपणे आपली भूमिका मांडली पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आमच्या सरकारवर टीका करणाऱ्यांनी आधी इतिहास बघावा. तुम्ही ५० वर्षे सत्तेत होता. यामुळे आरोप आणि टीका करण्यापूर्वी विचार करा, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला
No comments:
Post a Comment