Union Budget 2022 : देशात 5G लवकरच सुरू होणार; अर्थसंकल्पात मोठ्या योजनांची घोषणा
“गावागावांत ब्राॅडबॅण्ड सुविधा उभी करणार आहे. त्याचबरोबर लवकरच 5G ची सुरू करण्यात येणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये एटीएमची सुविधा देण्यात येणार आहे. आणि पासपोर्टमध्ये ई-चीप बसविण्यात येणार आहे. 5G योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्याचबरोबर टेलीकाॅम क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहे”, अशीही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडताना दिली.
रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सद्वारे डिजीटल शिक्षणावर भर
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल मत व्यक्त वित्तमंत्र्यांनी असं सांगितलं की, “शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल्स सुरू करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सद्वारे डिजीटल शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. “, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन संसदेत २०२२ चा अर्थसंकल्प मांडत आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, “कोरोना जास्त प्रभाव आपल्या देशावर पडलेला आहे. त्यातून आपल्या देशाची अर्थव्यवस्था हळुहळु सावरत आहे. देशाचा जीडीपी ९.२ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधेतून गुंतवणूक करणार आहे”, असं मत केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलं आहे.
5g nkoo amala 5g mule wtawarn madhe bigad hotye
ReplyDelete