पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली येथे स्मारकाचं गोमूत्र,दही,दूध पंचामृत यांनी शुद्धीकरण करून धनगर समाजाने 3 ते 5 तारीखला एक दिवस अन्नत्याग करावे - शशिकांत तरंगे - latur saptrang

Breaking

Wednesday, March 30, 2022

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली येथे स्मारकाचं गोमूत्र,दही,दूध पंचामृत यांनी शुद्धीकरण करून धनगर समाजाने 3 ते 5 तारीखला एक दिवस अन्नत्याग करावे - शशिकांत तरंगे

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली येथे स्मारकाचं गोमूत्र,दही,दूध पंचामृत यांनी शुद्धीकरण करून धनगर समाजाने 3 ते 5 तारीखला एक दिवस अन्नत्याग करावे - शशिकांत तरंगे



पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या अतिशय पारदर्शक राज्यकारभार करणाऱ्या दानधर्म करणाऱ्या हिंदू देवतांचा जीर्णोद्धार करणाऱ्या भारतातील एकमेव महाराणी होऊन गेल्या जगाने त्यांना केलेल्या पुण्याबद्दल पुण्यश्लोक ही पदवी जगामध्ये फक्त अहिल्यादेवी होळकर यांना बहाल करण्यात आली..



!!पुण्यश्लोको नलो राजा !!पुण्यश्लोक युधिष्ठीरा!! पुण्यश्लोको जगन्नाथा!! पुण्यश्लोको अहिल्या माता!!



अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार अतिशय पारदर्शक होता प्रजेच्या पैशातून घेतलेली मेणबत्ती दरबारामध्ये ज्यावेळेस प्रजेचे काम चालू असतं त्याच वेळेस त्या वापरत असे ज्यावेळी खाजगी होळकर घराण्यातील काम  असेल त्यावेळेस त्या होळकरांच्या संपत्तीतून घेतलेली मेणबत्ती वापरत असत कधीही त्यांनी प्रजेच्या पैशाचा मेणबत्ती साठी सुद्धा वापर केला नाही ऐवढा पारदर्शक राज्यकारभार करणारी जगातील एकमेव महाराणी म्हणून त्यांचा जगभरात नावलौकिक आहे 


परंतु त्याच अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्या संदर्भात वाद-विवाद समोर येत आहेत जनतेच्या पैशातून स्मारक उभे केले असताना नेतृत्वांनी स्वतःच्या हट्टासाठी सरकारच्या पैशातून लाखो रुपयांचा खर्च करून हे स्मारक व धनगर समाजाबद्दल असणारे प्रेम हे फक्त त्या दिवशी व्यक्त करणं अपेक्षित नाही ही याउलट अहिल्यादेवींचे कार्य हे किती पारदर्शक आहे आणि आजचे राज्यकर्ते किती त्या कार्यास साजेसं कार्य करतात याचेही चिंतन आपण सर्वांनी केले पाहिजे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या राजकीय पुढाऱ्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उदघाटन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.ते कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते असोत 


ज्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी श्रद्धा आसेल त्यांनी आपल्या आमदारांना, खासदारांना आपला पक्ष कार्यालयात महाराष्ट्रातील मंत्री महोदयांच्या कार्यालय मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा लावण्याचे आदेश द्यावेत..कारण 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेकडे बघून त्यांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून लोककल्याणकारी राज्यकारभार करण्याची बुद्धी सर्वच राजकीय प्रस्तापित पुढाऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.



छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे आदर्श आहेत



डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे आदर्श आहेत



सावित्रीबाई फुले या शिक्षणाच्या आदर्श आहेत



तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्श राज्यकारभाराच्या मार्गदर्शक आहेत 



त्यामुळे सर्वच राजकीय नेतृत्वांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे उगाच उद्घाटनासाठी समाजात सहभागी होणे योग्य नाही पोकळ समाजाबद्दल असणारे प्रेम दाखवणं हे आता समाजाला न रुचणार आहे ज्यावेळेस अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी सरकारने निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा होताना मी ऐकलेली नाही मग सरकार काल चे असो व सरकार आजचे असो अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक,नागपूर, ठाणे, सारख्या शहरांमध्ये भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रंथालय,हाॅस्पिटल उभे करून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करावा 


व त्याचे उदघाटन सुध्दा मोठ्या थाटामाटात सरकारने करावे असे आवाहन शशिकांत तरंगे यांनी  केले...

No comments:

Post a Comment