कोरोणा काळात वसुल केलेला असंवेधानिक दंडाचे ऑडीट करावे तो निधी राखीव ठेवावा : शहर भाजपाची मागणी - latur saptrang

Breaking

Wednesday, March 9, 2022

कोरोणा काळात वसुल केलेला असंवेधानिक दंडाचे ऑडीट करावे तो निधी राखीव ठेवावा : शहर भाजपाची मागणी




 लातूर दि.8 मार्च-


कोरोणा काळात मास्क न वापरल्या बद्दल आकारण्यात आलेला दंड हा असंवेधानिक आहे. लातूर महानगर पालिका, प्रशासनाकडून नागरीकाकडून मास्क नसल्याचे कारण दाखवून मोठा दंड वसुल केला आहे. हा वसुल केलेला दंड न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत राखीव ठेवावा अशी मागणी जिल्हाधिकारी, महानगर पालिकेच्या आयुक्ताकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
कोरोणाच्या काळात नागरीकानी मास्क वापरावे असे बंधन लातूर शहर महानगर पालिकेने शहरातील नागरीकांना केले होते. याचे उल्लंघन करणार्‍या नागरीकांना मास्क न वापरल्या बद्दल दंडात्मक कारवाई करत मोठा दंड वसुल केला आहे. असा दंड  माननिय उच्च न्यायालयाने कोरोना काळात मास्क न वापरल्याबद्दल प्रशासनाने जनतेकडुन वसूल केलेला दंड असवैधानिक आहे. असा निकाल नुकताच एका प्रकरणात दिला आहे. या न्यायालयाच्या निकालाला अनुसरून लातूर शहर महानगर पालिकेनेही लातूर शहरातील नागरीकाकडून मोठा दंड वसुल केला आहे.  असा लाखोंंचा दंड वसूल करण्यात आला आहे. असा वसुल केलेला दंड न्यायालयाच्या निर्देशानुसार असंवेधानिक आहे. लातूर शहर महानगर पालिकेकडून तो निधी माननिय उच्च न्यायालयाचा पुढील आदेशापर्यंत राखीव ठेवावा. अशी मागणी भारतीय जनता पार्टी लातूर शहरजिल्हयाच्या वतिने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगर पालिका आयुक्त यांना आज मंगळवार दि. 8 मार्च रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे लातूर शहर जिल्हाअध्यक्ष गुरूनाथ मगे,  सरचिटणीस मनिष बंडेवार,प्रविण सावंत, अ‍ॅड. दिग्वीजय काथवटे, देविदास काळे,  सतिष ठाकुर, श्रीराम कुलकर्णी, किशोर जैन, अ‍ॅड. प्रदिप मोरे, गणेश गवारे, विपुल गोजमगुंडे, गणेश हाके, बायस, शिवदयाल राठी, वैभव वनारसे, संतोष ठाकुर, गजेंद्र बोकण, अर्जीत पाटील कव्हेकर, अजय पाटील, मेनकुदळे  यांच्या यावर सह्या आहेत.

No comments:

Post a Comment