ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण ३१ मार्चपर्यंत करण्याचे आवाहन - latur saptrang

Breaking

Friday, March 4, 2022

ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण ३१ मार्चपर्यंत करण्याचे आवाहन








पुणे: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती यांनी ऑटोरिक्षा चालकांनी गैरसोय टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटर पुन:प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करण्याकरीता ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून या मुदतीत सर्व ऑटोरिक्षा चालक, मालकांनी ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण व मीटर तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 


मीटर तपासणीचे कामकाज फुलेनगर, आळंदी रस्ता चाचणी मैदान या ठिकाणी सुरु आहे. ऑटोरिक्षाधारक मीटर पुन:प्रमाणीकरण करुन न घेतल्यास त्यांच्यावर मुदत समाप्तीनंतर किमान ७ दिवस आणि कमाल ४० दिवस या मर्यादेत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी १ दिवस परवाना निलंबन केले जाईल. निलंबनाऐवजी तडजोड शुल्क जमा करण्यात इच्छुक ऑटोरिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये आकारण्यात येईल जे किमान ५०० रुपये आणि कमाल २ हजार रुपये या मर्यादेत राहील, 

असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी कळवले आहे.

No comments:

Post a Comment