पहिल्या सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येणार
मुंबई दि 29 : महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील तिकीट विक्री स्टाॅलचा शुभारंभ त्रिमूर्ती प्रांगणात राज्य लॉटरी आयुक्त अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.
मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगण येथील हा स्टॉल 12 एप्रिल पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे.
12 एप्रिल 2022 रोजी सायं. 04.00 वाजता सोडत असून एकूण बक्षिसांची संख्या 8602 आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिस रू. 51,00,000/- असून, तिकीटाची किंमत रू. 200/- आहे. एकूण बक्षिसांची रक्कम रू. 98,55,000 आहे. तर पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी अवर सचिव तथा उपसंचालक, राज्य लॉटरी, श्री. प्रशांत पाटील, सहायक राज्य लॉटरी अधिकारी सुनिल लोटणकर उपस्थित होते.
—000—-
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/QhaPzGu
https://ift.tt/uEJhCoO
No comments:
Post a Comment