उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते समता सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन - latur saptrang

Breaking

Sunday, March 27, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते समता सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

बारामती, दि. 27 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील निंबुत येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नीरा या संस्थेने बांधलेल्या समता पॅलेस व समता रॉयल या नुतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, सुनेत्रा पवार, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अपर निबंधक शैलेश कोथमिरे, डॉ. पी. एल. खंडागळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप फरांदे, उपाध्यक्ष उत्तम आगवणे, सचिव युवराज फरांदे, व्यवस्थापक राहुल ढोले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.पवार म्हणाले, पतसंस्थेमध्ये विश्वासाने ठेवलेल्या ठेवी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. संस्थेत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सर्वांनी काम करावे. संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब बांधवाना मदत कशी मिळेल याकडे संस्थेच्या संचालक मंडळाने लक्ष द्यावे. भविष्यात संस्था अशाचप्रकारे पारदर्शक काम करुन यशाचे शिखर गाठेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/pclnhwY
https://ift.tt/8NCnrjV

No comments:

Post a Comment